18th Lok Sabha Speaker Om Birla : १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील घोषणा केली. आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली.

भाजपचे उमेदवार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. सत्ताधारी आघाडीच्या बाजूने संख्याबळ असल्याने एनडीएचे उमेदवार अध्यक्षपद राखू शकले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ओम बिर्ला यांचे पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनंदन केले. मोदी आणि गांधींनी अध्यक्षपदांना त्यांच्या खुर्चीपर्यंत सोबत केली आणि त्यांच्या साक्षीने ओम बिर्ला यांनी खूर्ची स्वीकारली. बिर्ला यांचा गेल्या टर्ममध्ये अध्यक्ष होण्याचा अनुभव त्यांना देशाला आणखी मार्गदर्शन करण्यास मदत करेल, असे पंतप्रधान मोदी यांनी आज सांगितले. दरम्यान, काल (२५ जून) संध्याकाळी सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एकमत होऊ न शकल्याने त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. इंडिया आघाडीच्या वतीने के.सुरेश यांनी अर्ज केला होता.

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
Sharad Pawar Ajit Pawar fb
Ajit Pawar : “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं

लोकसभाध्यक्षांची नियुक्ती बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या वतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांच्यावर विरोधकांशी बोलणी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. राजनाथ सिंह यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी सोमवारीपासून फोनवरून संपर्क केला होता व सहमतीने लोकसभाध्यक्षांची  निवड करण्याची विनंती केली होती. राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावावर काँग्रेससह इंडियातील घटक पक्षांनी सहमतीही दाखवली होती. मात्र उपाध्यक्षपदाच्या मुद्द्यावर ही बोलणी फिस्कटली.

उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस आग्रही

लोकसभाध्यक्षपदाची निवड बिनविरोध होईल त्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्ष भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील, असे निश्चित झाले होते. पण लोकसभेचे उपाध्यक्षपद काँग्रेसला दिले जावे, अशी मागणी काँग्रेसचे संघटना महासचिव व खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी केली. वास्तविक, उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्याची तयारीही भाजपाने दाखवली होती. मात्र, तसे उघड आश्वासन देण्यास भाजपाने नकार दिला. विरोधकांचे म्हणणे मान्य केले जाऊ शकते, पण विरोधकांनी अटी घालू नये, असे भाजपाचे म्हणणे होते. पण वेणुगोपाल यांनी तडजोड करण्यास नकार दिल्याने भाजपा व काँग्रेसमधील बोलणी अपयशी ठरली. दरम्यान, आता अध्यक्षपद भाजपाकडे गेल्याने उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा >> Parliament Session 2024 LIVE Updates : ओम बिर्ला उत्तम प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करतील-मोदी

राहुल गांधींनी केले अभिनंदन

“आम्हाला विश्वास आहे की विरोधी पक्षाला बोलण्याची परवानगी देऊन, आम्हाला भारतातील लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची परवानगी देऊन, तुम्ही भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याचे तुमचे कर्तव्य पार पाडाल. मी पुन्हा एकदा तुमचे आणि सर्व सदस्यांचे अभिनंदन करू इच्छितो”, असं म्हणत राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले.