भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी, भाजपा आमदार रिवाबा जडेजा, भाजपा खासदार पुनम माडम आणि महापौर बीना कोठारी यांच्यात कडाक्याचा वाद झाला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रिवाबा जडेजा भाजपा खासदार माडम आणि महापौरांवर रागवताना दिसत आहेत. यावर आता खासदार माडम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांनी सांगितल्यानुसार, शहिदांना श्रद्धांजली देताना खासदार पुनम माडम यांनी चप्पल घातलेली होती. जेव्हा श्रद्धांजली वाहण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांनी चप्पल काढली. यानंतर खासदार माडम यांनी रिवाबा यांनी दिखाऊपणासाठी चप्पल काढल्याची शेरेबाजी केली.

हेही वाचा : VIDEO: लायकीत राहा म्हणत भांडण का झालं? कारण सांगत रिवाबा जडेजा म्हणाल्या, “पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही…”

रिवाबा जडेजा यांनी खासदार माडम आणि महापौर कोठारी यांना फार हुशारी दाखवू नका असं म्हटलं. तसेच, पुनम माडम यांच्यामुळेच वाद झाल्याचा आरोप केला. रिवाबा जडेजा म्हणाल्या, “हा वाद तुम्हीच सुरू केला आहे आणि आता वाद थांबवण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही सार्वजनिकपणे माझ्यासाठी ‘ओव्हर स्मार्ट (अतिहुशार)’ शब्दाचा वापर केला.” यानंतर चिडलेल्या खासदार पुनम माडम यांनी रिवाबाला लायकीप्रमाणे राहा, असं म्हटलं.

आता माडम यांनी गैरसमजातून वाद झाल्याचं सांगितलं आहे. पुनम माडम म्हणाल्या की, “गैरसमजातून वाद झाला. भाजपा हे आमचं कुटुंब आहे. प्रत्येकजण एकमेकांची ताकद आहे. सर्व काही माध्यमांसमोर घडलं आहे. त्यापलीकडे काहीही नाही.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp poonamben maadam clarifies after argument with rivaba jadeja ssa
Show comments