माजी केंद्रीय राज्यमंत्री व भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार राम शंकर कठेरिया यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. २०११ मध्ये ‘टोरेंट पॉवर’च्या कार्यालयाची तोडफोड करणे आणि अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी आग्रा येथील खासदार/आमदार न्यायालयाच्या विशेष दंडाधिकाऱ्याने ही शिक्षा सुनावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, १६ नोव्हेंबर २०११ रोजी मॉलमधील ‘टोरेंट पॉवर’ कार्यालयाची तोडफोड करणं आणि अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप खासदार कठेरिया यांच्यावर आहे. आता त्यांना आग्रा येथील न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. त्यामुळे कठेरिया यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- “राहुल गांधींना आता त्यांची खासदारकी तातडीने..”, काय म्हणाले आहेत पीडीटी आचार्य?

तुरुंगवासाच्या शिक्षेवर प्रतिक्रिया देताना खासदार राम शंकर कठेरिया यांनी ‘एएनआय’ला सांगितलं की, “मी आज नेहमीप्रमाणे न्यायालयात हजर झालो. न्यायालयाने माझ्याविरोधात निर्णय दिला आहे. मी न्यायालयाचा पूर्ण आदर करतो. मला अपील करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा मी वापर करेन.

हेही वाचा- “आता पुढे काय करायचं ते…”, सर्वोच्च दिलासा मिळाल्यावर काय म्हणाले राहुल गांधी?

राम शंकर कठेरिया हे उत्तर प्रदेशातील इटावा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम १४७ (दंगल) आणि ३२३ (दुखापत करणे) अंतर्गत दोषी ठरवलं आहे. राम शंकर कठेरिया यांनी यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री आणि एससी-एसटी आयोगाचे अध्यक्षपद भूषवलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp ram shankar katheria sentenced to two years for assault case may disqualify as mp loksabha rmm
Show comments