भारताबरोबरच विदेशातही मोदी लाट असल्याचे वक्तव्य भाजपा खासदार रवी किशन यांनी केले आहे. गोरखपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – Gyanvapi Mosque : न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेससह विरोधकांचे मौन; कारण काय?

काय म्हणाले रवी किशन?

“मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की, भारतात जन्माला आलो. आज संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत आहे. मी स्वत: अनेक देशांना भेट दिली आहे. तिथे गेल्यावर भारतीयांना कसा सन्मान मिळतो, हे मी बघितले आहे. दिवसेंदिवस भारताची लोकप्रियता वाढत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मोठे योगदान आहे. मोदी लाट केवळ भारतात नसून विदेशातही आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते रवी किशन यांनी दिली आहे.

हेही वाचा – गुजरात विधानसभा निवडणूक : अमित शाहांचा केजरीवाल यांच्यावर निशाणा; म्हणाले, “स्वप्नांचा बाजार करणारे…”

राहुल गांधींवरही केली टीका?

“यावेळी रवी किशन यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेवरूनही टीका केली. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नसून भारत तोडो यात्रा आहे. ज्या उत्तर प्रदेशमधून राहुल गांधी, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी खासदार होते, त्या उत्तर प्रदेशमधून ही यात्रा सुरू करण्यापेक्षा त्यांनी तामिळनाडूमधून ही यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा भाजपावर कोणताही परिणाम होणार नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – BJP Protest West Bengal: पश्चिम बंगालच्या रस्त्यांवर दगडफेक, जाळपोळ; कार पेटवली, पोलिसांकडून आंदोलकांवर पाण्याचा मारा

अरविंद केजरीवालांवरही टीकास्र

“आम्ही यावेळीही गुजरात निवडणूक जिंकणार असून गुजरातमधील नागरीक अरविदं केजरीवालांना उत्तर देतील. अरविंद केजरीवाल जे स्वप्न बघत आहेत, ते पुढचे ३५ वर्ष पूर्ण होणार नाही, तोपर्यंत त्यांनी हिमालयात निघून जावं”, असेही ते म्हणाले.