गेल्या काही दिवसांपासून भाजपा खासदार वरुण गांधी यांनी सातत्याने आपल्या पक्षाच्या केंद्र सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी जवळपास वर्षभरापासून सुरू केलेल्या आंदोलनाला वरुण गांधींनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका देखील केली आहे. त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची नाराजी देखील त्यांनी वारंवार ओढवून घेतली आहे. यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्राकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवर वरुण गांधी यांनी निशाणा साधला असून यासाठी त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

वरुण गांधी यांनी हा व्हिडीओ शेअर करताना “एका विशाल ह्रदयाच्या माणसाचे शहाणपणाचे शब्द”, असा मेसेज लिहिला आहे. या व्हिडीओमध्ये अटल बिहारी वाजपेयींनी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारवर टीका करताना शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा मानस स्पष्ट केला आहे. “मी सरकारला इशार देतो की तुम्ही या दबाव टाकण्याच्या पद्धती सोडून द्या. घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. शेतकरी घाबरणार नाहीत”, असं अटल बिहारी वाजपेयी या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत.

Sharad Pawar criticism that such rulers have not been seen in the history of the maharshtra state pune print news
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
amit shah criticized rahul gandhi congress
“परदेशात जाऊन देशाचा अपमान करणाऱ्यांना…”, हरियाणातील विजयानंतर अमित शाहांचा राहुल गांधीवर हल्लाबोल!
Rahul Gandhi on Vinayak Damodar Savarkar
Rahul Gandhi: वीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाचे समन्स; ‘या’ तारखेला हजर राहण्याचे आदेश
maharashtra government taking rash decisions just to get votes
महायुती सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी कधी? काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सवाल
BJP questioned Rahul Gandhi after a corruption case was filed against Siddaramaiah
सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल
rahul gandhi criticized narendra modi
कंगना रणौत यांच्या माफीनाम्यानंतर राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना इशारा; म्हणाले, “जर पुन्हा कृषी कायदे लागू करण्याचा प्रयत्न केला, तर…”
Rahul Gandhi on veer Savarkar
राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रारीची विशेष न्यायालयात सुनावणी, स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान

“जर सरकार दबावतंत्र वापरणार असेल…”

या व्हिडीओमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी सरकारला इशारा देखील दिला आहे. “आम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा राजकारणासाठी वापर करू इच्छित नाही. पण आम्ही शेतकऱ्यांच्या योग्य मागणीला समर्थन देतो. जर सरकार दबावतंत्र वापरणार असेल, कायद्याचा दुरुपयोग करणार असेल आणि शांततापूर्ण आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न करेल, तर शेतकऱ्यांच्या संघर्षात उडी घेण्यात आम्ही अजिबात मागे हटणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू”, असं वाजपेयींनी म्हटलं आहे.

वरुण गांधी यांना शेतकरी आंदोलनाविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे सातत्याने पक्षश्रेष्ठींच्या नाराजीचा सामना करावा लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपाच्या केंद्रीय पक्ष कार्यकारिणीमधून त्यांना आणि त्यांच्या आई मनेका गांधी यांना डच्चू देण्यात आला आहे.