Lok sabha Security Breach Updates : लोकसभेत दोन व्यक्तींनी घुसखोरी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. या लोकांनी स्वतःसह स्मोक कॅनदेखील सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये नेले होते. या व्यक्तींना कोणत्या खासदाराने व्हिजिटल पास दिला, हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र बसपाने पक्षातून हकालपट्टी केलेले खासदार दानिश अली यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, दोनपैकी एका घुसखोराकडून जेव्हा त्याचे सामान हस्तगत केले गेले. तेव्हा त्याच्याकडे भाजपाचे खासदार प्रताप सिंह यांच्या कार्यालयाचा पास आढळून आला. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, दोघांही घुसखोरांकडे खासदार सिंह यांच्या कार्यालयाकडून पास देण्यात आलेले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लोकसभेतील खासदारांनी या प्रसंगाबाबत माहिती देताना सांगितले की, दोन्ही घुसखोरांनी संसदेत येत असताना सुरक्षेचे सर्व टप्पे पार पाडले होते. २००१ साली संसदेत झालेल्या हल्ल्यानंतर २२ वर्षांनी पुन्हा एकदा संसदेत घुसखोरी करण्यात आलेली आहे.

कोण आहेत प्रताप सिंह?

प्रताप सिंह हे कर्नाटकमधील म्हैसूरचे भाजपाचे खासदार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन घुसखोरांपैकी एक व्यक्ती प्रताप सिंह यांच्या मतदारसंघातील आहे. डी. मनोरंजन (वय ३५) हा प्रताप सिंह यांच्या मतदारसंघातला आहे. मनोरंजनने म्हैसूर विवेकानंद विद्यापीठ, बंगळुरू येथून इंजिनिअरींगमध्ये पदवी मिळवलेली आहे, अशी माहिती त्याच्या वडीलांनी दिली असल्याचे एनडीटीव्हीने आपल्या बातमीत म्हटले आहे.

भाजपाचे खासदार प्रताप सिंह यांनी २०१४ साली पहिल्यांदा ४३.४६ टक्के मते मिळविली होती. त्यानंतर २०१९ साली त्यांनी ५२.२७ टक्के मते मिळवली होती. ४२ वर्षीय प्रताप सिंह हे माजी पत्रकार असून ते लिहित असलेल्या सदरामुळे ते लोकप्रिय आहेत. २००७ साली त्यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मचरित्र लिहिले होते. शेतकऱ्याचे पुत्र असलेले सिंह हल्लीच म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे आदर्शस्थान आहेत.

आज दुपारी १ वाजता डी. मनोरंजन आणि सागर शर्मा यांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली. लोकसभा टीव्हीच्या लाईव्ह फुटेजमध्ये सागर नावाचा व्यक्ती सभागृहाच्या बाकांवरून लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने पळत सुटलेला दिसत आहे. तर डी. मनोरंजनने त्याच्याकडी कॅनमधून पिवळसर धूर सभागृहात सोडला. या दोन व्यक्तीव्यतिरिक्त नीलम आणि अमोल शिंदे नामक आणखी दोन व्यक्तींना अटक झाली आहे. या दोघांनी संसदेच्या बाहेर घोषणाबाजी करत कॅनमधून धूर सोडला होता.

खासदार प्रताप सिंह यांच्यावर कारवाई करा

या घुसखोरांना व्हिजिटर पास दिल्याबद्दल खासदार प्रताप सिंह यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेस पक्षाने सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली.

खासदारांनी उपस्थित केला सुरक्षेचा प्रश्न

सदर घटनेनंतर सभागृहात उपस्थित असलेल्या खासदारांनी बाहेर आल्यानंतर नाराजी व्यक्त केली. संसदेची इमारत नवीनच आहे. तरीही त्यात सुरक्षेबद्दल हलगर्जी असेल तर हे चिंताजनक आहे, अशी टीका खासदारांनी व्यक्त केली. काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले की, “कदाचित हा धूर विषारीही असला असता किंवा स्मोक बॉम्बही असू शकला असता. आजच्या दिवशीच १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला झाला होता. त्यामुळे याच दिवशी पुन्हा अशाप्रकारे घुसखोरी होणे, हे खूपच गंभीर आहे.”

शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही सुरक्षेबाबतचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समाजवादी पक्षाच्या खासदार डिम्पल यादव म्हणाल्या की, न्या संसद भवन इमारतीमध्ये खूप लोक येत असतात. प्रेक्षक आणि पत्रकार गॅलरीत बसणारे लोकांना आयडी दिलेला आहे. पण कुणीही तो गळ्यात वागवत नाही. येता-जाता गेटवर गर्दी असते.