एक्स्प्रेस वृत्त, पौरी गढवाल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उत्तराखंडमधील गढवाल या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे राष्ट्रीय माध्यमप्रमुख अनिल बलुनी हे रिंगणात आहेत. १९ एप्रिल रोजी येथे निवडणूक होत आहे. दिल्लीत भाजपमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या बुलनी यांचा हा मतदारसंघ राजधानीपासून खूप दूर. येथील अरुंद गल्ल्यांतून बलुनी यांचा प्रचार सुरू आहे. प्रचारात अनेक अडचणी असून बलुनी दिवसभरात २५ ते ३० ठिकाणी भेटी देत आहेत. दररोज सुमारे ३०० किमी अंतर ते त्यांच्या प्रचार चमूकडून पूर्ण केले जाते.
चमोली, रुद्रप्रयाग, टेहरी गढवाल, पौरी गढवाल आणि नैनिताल या पाच जिल्ह्यांत विस्तीर्ण असा हा मतदारसंघ. एकूण विधानसभेचे चौदा मतदारसंघ यामध्ये येतात. आशेचा संदेश घेऊन आलो आहे. ती आशा प्रत्येकाच्या डोळय़ांत प्रतिबिंबित झालेली असे बलुनी यांनी नमूद केले. येथील यश हे विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांना पंतप्रधान होण्यासाठी महत्त्वाचे ठरते असे ते नमूद करतात.
हेही वाचा >>>ईशान्येकडील २५ जागा भाजपसाठी आव्हानात्मक
महत्त्वाची ठिकाणे
गढवाल या मतदारसंघात केदारनाथ, बद्रीनाथ यांसारखी महत्त्वाची धार्मिक स्थळे, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. तसेच जोशीमठसारखे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र या मतदारसंघात येते. या मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढणारे अनिल बलुनी हे प्रचाराला निघताना सकाळी घंटाकर्ण देवता मंदिराला भेट देतात, तर संध्याकाळी देवप्रयाग संगम येथे गंगा आरती करतात. पाच जिल्ह्यांच्या गढवाल मतदारसंघात अनिल बलुनी यांनी सार्वजनिक मेळावे, रस्त्यावरील कोपरा सभा यावर अधिक भर दिला आहे. तसेच यात टेकडय़ांचा अधिक भाग आहे. प्रचारात ठिकठिकाणी बलुनी यांचे स्वागत होते. कीर्ती नगर परिसरातील सभेत त्यांनी उत्तराखंड मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात विकसित केले जाईल असे नमूद केले. लोकांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा जनतेचा निर्धार आहे असे बलुनी सांगतात. यातून उत्तराखंड तसेच गढवालच्या विकासाची गती वाढेल असा बलुनी यांचा विश्वास आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष गणेश गोडियाल रिंगणात आहेत.
भाजपचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते असलेले अनिल बलुनी उत्तराखंडच्या गढवालमधून रिंगणात आहेत. केंद्र व राज्य सरकारने चौफेर विकास केल्याचा दावा ते प्रचारात करत आहे. भाजप उमेदवार अनिल बलुनी यांचा गढवाल मतदारसंघात प्रचार सुरू आहे.
हेही वाचा >>>न्यायालयांचा केजरीवाल यांना पुन्हा धक्का; तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ?
मतदारसंघाचे गणित
या मतदारसंघातील १४ विधानसभा मतदारसंघांपैकी १३ ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. बद्रीनाथ या एकमेव जागी काँग्रेसचे आमदार आहेत. २०१९ मध्ये भाजपचे तिरथसिंह रावत हे विजयी झाले होते.
विकासाचा दावा
उत्तराखंडमध्ये उत्तम सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. भाजपने गरिबांना ८५ हजार घरे दिली आहेत. १२ लाख घरांना नळजोडण्या तर साडेपाच लाख घरांमध्ये शौचालये बांधण्यात आली आहेत.