भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे ट्विटर अकाउंट आज (रविवार) हॅक झाले आहे. सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांच्या ट्वीटर अकाउंटवरून काही ट्वीट देखील केले गेले आहेत.
ज्यामध्ये युक्रेनच्या मदतीसाठी उभा रहा, क्रिप्टोकरन्सीचे दान करण्याचे आवाहन केले गेले आहे. मागील काही दिवसांमध्ये ट्वीटर अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या ट्वीटर अकाउंटचा देखील समावेश आहे.
पंतप्रधान मोदींचे ट्वीटर अकाउंट हॅक झाले होते –
यापूर्वी मागील वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान मोदींचे ट्वीटर अकाउंटही हॅक झाले होते. याद्वारे एक ट्वीट केलं गेलं होतं की, भारताने बिटकॉइनला अधिकृतरित्या कायदेशीर मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर हँडल काही काळासाठी हॅक झाल्याचे पीएमओने म्हटले होते. या प्रकरणाची दखल ट्वीटरकडून घेण्यात आली होती. त्यानंतर लगेच मोदींचे ट्वीटर अकाउंट सुरक्षित करण्यात आले. खाते हॅक झाल्याच्या काळात शेअर केलेले कोणतेही ट्विट दुर्लक्षित केले जावे, असे पीएमओने म्हटले होते.