गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलींमुळे इंडियन मुजाहिदीनसारखी दहशतवादी संघटना उदयाला आल्याचा आरोप रविवारी काँग्रेसने केला. तर काँग्रेसच्या आरोपांचा समाचार घेत मतांसाठी काँग्रेसच जातीय राजकारण करीत प्रतिआरोप भाजपने केला आहे.
गुजरात दंगलीनंतर इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा उदय झाल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीय राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते शकिल अहमद यांनी ट्विटरवरून केला आहे.
देशातील जातीय राजकारण थांबावे अशांनी भाजप आणि आरएसएससारख्या पक्ष तसेच संघटनांवर दबाव टाकण्याची गरज असल्याचे अहमद यांनी म्हटले
आहे.
अहमद यांच्या वक्तव्याचे खंडन करताना भाजपने काँग्रेसचा हा आरोप निंदनीय आणि चुकीचा आहे. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या अशाप्रकारच्या संघटनांना पाकिस्तानकडून मदत मिळते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि अशा प्रकारच्या संघटनांचा आधार घेत काँग्रेसच जातीय राजकारण करीत देशाच्या सुरक्षेशीच खेळत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
२००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीचा परिणाम म्हणून इंडियन मुजाहिदीनसारखी संघटना अस्तित्वात आली. त्यामुळे जातीवर आधारित राजकारण थांबवले तर इंडियन मुजाहिदीनसारख्या संघटना बंद होतील, शकील अहमद, कॉंग्रेस नेते
देशाला भेडसावणाऱ्या महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी अशा प्रश्नांवर तोडगा काढण्यात काँग्रेसला अपयश आल्यामुळेच ते जातीय राजकारण खेळत आहेत.
रवीशंकर प्रसाद ,
भाजप नेते
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा