नवी दिल्ली : भाजपने संघटनात्मक बदलांना सुरुवात केली असून २४ राज्यांत नवे प्रदेश प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्याकडे बिहार तर माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळचे प्रभारी पद कायम ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर पुढील वर्षी जूनमध्ये बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. ४० पैकी एनडीए आघाडीला तीस जागा मिळाल्या आहेत. बिहारमधील या यशात विनोद तावडे यांचाही वाटा मोठा असून संघटनात्मक कौशल्यामध्ये मुरलेले तावडे यांना प्रभारीपदी कायम ठेवण्यात आले आहे.

BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका
Maharashtra Assembly Elections 2024 Narendra Modi BJP MVA
‘गुजरात मॉडेल’चा महाराष्ट्रात पायरव…
mla subhash dhote
आणखी एका पराभूत उमेदवाराची ईव्हीएमवर शंका… अडीच लाख रुपये भरून….
bjp guardian minister nashik marathi news
जल्लोषातून पालकमंत्रिपदावर दावा, भाजपची अजित पवार गटाला शह देण्याची तयारी
devendra fadnavis bjp majority seats
विदर्भाची भाजपला साथ, काँग्रेसचीही राखली लाज
wardha district bjp mla
भाजपला तर यश मिळाले, आमचे काय ? महासंघाचा सवाल…

लोकसभा निवडणुकीत भाजपने या वेळी केरळमध्ये पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. थ्रिसूर मतदारसंघातून सुरेश गोपी विजयी झाले आहेत. केरळमध्ये गेली दोन वर्षे प्रकाश जावडेकर संघटनात्मक बांधणी करत होते. त्यांच्या प्रयत्नांना लोकसभा निवडणुकीत यश आल्यामुळे त्यांच्याकडे केरळचे प्रभारी पद कायम ठेवण्यात आले असल्याचे मानले जाते.

हेही वाचा >>> परीक्षा रद्द करण्यास विरोध; ‘नीटयूजी’प्रकरणी केंद्राचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

आगामी चार महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत आहे. राज्यातील प्रभारी पद रिक्त असले तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व अश्विनी वैष्णव यांची अनुक्रमे निवडणूक प्रभारी व उपप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यादव व वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात राज्यातील भाजप नेत्यांची निवडणुकीच्या तयारीसंदर्भात महत्त्वाची बैठक घेतली होती. त्यानंतर नवे प्रभारी नियुक्त केले जातील असे मानले जात होते, मात्र शुक्रवारी जाहीर झालेल्या नव्या प्रदेश प्रभारी पदाच्या नियुक्तींमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही. प्रदेश भाजपमधील संघटनात्मक महासचिव पदही रिक्त आहे. यापूर्वी भाजपचे कर्नाटकातील नेते व माजी महासचिव सी. टी. रवी यांनी महाराष्ट्राचे प्रभारी पद सांभाळले होते.

जम्मू काश्मीरमध्येही पुढील दोन महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार असून या राज्याची जबाबदारी तरुण चुघ व आशीष सूद यांच्याकडे देण्यात आली आहे. सूद गोव्याचेही प्रभारी असतील.

भाजपचे खासदार संबित पात्रा यांच्याकडे ईशान्येकडील राज्यांच्या समन्वयक पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी पंजाबचे नवे प्रभारी असतील. केरळचे सहप्रभारी राधा मोहनदास अगरवाल यांना बढती देण्यात आली असून त्यांची कर्नाटकच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गोपछडे यांच्याकडे मणिपूरची जबाबदारी

भाजपचे नांदेडचे नेते व राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांच्याकडे अत्यंत संवेदनशील असलेल्या मणिपूरची जबाबदारी देण्यात आली आहे. वर्षभर वांशिक हिंसाचारामुळे तणावग्रस्त असलेल्या मणिपूर भाजपचे प्रभारी म्हणून गोपछडे यांची नियुक्ती झाली आहे.

रघुनाथ कुलकर्णी अंदमानमध्ये…

अंदमान निकोबारचे प्रभारी पद रघुनाथ कुलकर्णी यांना देण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशचे सहप्रभारी पद होते, मात्र आता त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले असून त्यांच्या जागी सतीश उपाध्याय यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेंद्रसिंग हे मध्य प्रदेशचे प्रभारी असतील.

Story img Loader