पंतप्रधानसाठी भाजपचा उमेदवार कोण असेल हे स्पष्ट आहे, उमेदवारीचा घोळ काँग्रेसमध्ये आहे त्यांना यावर विचारमंथन कऱण्याची गरज आहे, असे पक्ष अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी सांगितले. मतदानापूर्वी भाजप पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार जाहीर करणार का? असा प्रश्न विचारला असता, राजनाथ म्हणाले की, ” ये सवाल आप काँग्रेस से पूछिये, हमारा तो क्लियर है”.
जूनमध्ये गोव्यात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारी बैठकीत भाजपाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निवडणूक मोहीम समितीच्या मुख्यपदी ठेवले होते. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील अथवा नाही, याच्याशी निगडीत प्रश्नांना राजनाथ आणि काँग्रेस नेत्यांनी कानाडोळा केला आहे. राजनाथ सिंग हे भाजपा कामगारांच्या प्रशिक्षण कार्यक्रमास संबोधित करण्यासाठी पालमपूर येथे गेले आहेत. तेथे त्यांनी कामगारांना एकत्र राहण्याचा आणि उच्चस्तरीय विश्वासार्हतेचा सल्ला दिला.
मोदी आणि राजनाथ यांनी निवडणूक तयारीसंबंधी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दिल्लीत भेट घेतली. त्यावर, इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री रमण सिंग म्हणाले की, भाजप उमेदवाराच्या निर्णयासाठी घाई करण्याची गरज नाही. काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नसून इतर पक्षांनीदेखील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. निवडणूक संपल्यावर उमेदवारांची संख्या स्पष्ट झाल्यानंतरही उमेदवारांच्या नावावर चर्चा केली जाऊ शकते, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा