भाजपाशी बंडखोरी करणाऱ्या गुजरातमधील आमदाराने लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. “माझ्या लोकांशी गैरवर्तन करणाऱ्या कोणालाही मी गोळी घालेन”, असं वादग्रस्त विधान मधू श्रीवास्तव यांनी केलं आहे. २००२ गुजरात दंगलीतील एका प्रकरणात श्रीवास्तव आरोपी आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपानं तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत आहेत.
“मी अपक्ष लढणार आहे. जर कोणीही माझ्या लोकांसोबत गैरवर्तन केलं तर मी त्यांना गोळी घालेन”, अशी धमकी श्रीवास्तव यांनी वडोदरातील वाघोडिया येथील सभेत दिली आहे. मधू श्रीवास्तव वाघोडिया मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. १८ मुस्लिमांना जिवंत जाळल्याच्या ‘बेस्ट बेकरी’ प्रकरणात श्रीवास्तव मुख्य आरोपी आहेत. जमीनदार असलेल्या या आमदारावर आणखी आठ खटले दाखल आहेत.
२००८ मध्ये सार्वजनिक ठिकाणी वाद घातल्याप्रकरणी वडोदरा पोलिसांनी त्यांना अटक केली होती. २०१४ मध्ये त्यांनी ‘लायन ऑफ गुजरात’ नावाचा गुजराती चित्रपट बनविला. या चित्रपटात तेच हिरोच्या भूमिकेत होते. २५ वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या आग्रहाखातर भाजपात प्रवेश केल्याचे आज दु:ख होत आहे, असं श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. त्यांनी आत्तापर्यंत सहा वेळा आमदारकी भुषवली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३८ विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला आहे. यात श्रीवास्तव यांचाही समावेश आहे. भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत पाच मंत्र्यांनाही तिकीट नाकारण्यात आलं आहे. गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी एक आणि पाच डिसेंबरला मतदान होणार आहे.