तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. तेलंगणा विधानसभेसाठी ३० नोव्हेंबरला आणि निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. अशातच भाजपानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच तेलंगणातही तीन खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपानं आज ( २२ ऑक्टोबर ) ५२ उमेदवारांची घोषणा केली आहे. यात मोहम्मद प्रेषित यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे टी राजा यांना गोशामहल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. हुजुराबाद आणि गजवेल या दोन मतदारसंघातून राजेंद्र इटाळा रिंगणात उतरणार आहेत. इटाळा हे भारत राष्ट्र समिती ( पूर्वीचा तेलंगणा राष्ट्र समिती ) पक्षाचे सदस्य होते. पण, आता गजवेल मतदारसंघात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधात इटाळा भिडणार आहेत.

हेही वाचा : कर्नाटक आणि हिमाचलच्या निर्णय प्रक्रियेमुळे तेलंगणातील मतदारांमध्ये काँग्रेसबद्दलचा विश्वास वाढला, पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांचे निरीक्षण

भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष, खासदार संजय कुमार बंदी करीमनगरमधून, खासदार सोयम बापू रावांना बोथ येथून आणि अरविंद धर्मापुरींना कोरतला मतदारसंघातून उमेदरवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. तेव्हा ही नावे निश्चित करण्यात आली आहेत.

हेही वाचा : मध्य प्रदेशमध्ये प्रादेशिक पक्ष बिघडवणार भाजपा-काँग्रेसच्या मतांचे गणित? काय सांगते जुनी आकडेवारी?

काँग्रेसनं १५ ऑक्टोरला ५५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यात प्रदेशाध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी यांना कोडंगलमधून आणि माजी प्रदेशाध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी यांना हुजूरनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp releases 1st list of telangana 52 candidates 3 sitting mps get tickets ssa