पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. मोदींच्या या दौऱ्यावर काँग्रेसने निशाणा साधलेला आहे. देशात वीज आणि महागाईचे संकट असताना पंतप्रधान हे परदेश दौऱ्यावर असल्याने काँग्रेसने ट्वीटद्वारे टीका केली आहे. “देशात संकटाचं वातावरण आहे, मात्र साहेबांना परेदशात जाणं आवडत आहे.” असं काँग्रेसने म्हटलं आहे. तर, काँग्रेसच्या या टीकेला भाजपाकडून देखील प्रत्युत्तर दिलं गेलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे एका नाईट क्लबमध्ये असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ ट्वीट करून आता भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. “साहेबांना पबमध्ये पाहिलं आहे, काल केलेल्या ट्वीटचा आज अर्थ समजला आहे. ” असं भाजपाने म्हटलं आहे.
राहुल गांधी यांचा काठमांडू येथील नाईट क्लबमधील व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा राहुल गांधींना घेरलं आहे. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
युजर्सनी घेतला आनंद –
विवेक नावाच्या युजरने राहुल गांधींचा व्हिडीओ शेअर केला आणि काँग्रेसच्या ट्विटवर प्रश्न उपस्थित केला की, तुम्ही लोक तुमच्याच नेत्याला ट्रोल करत आहात का? तर, एलबी सिंग नावाच्या युजरने लिहिले आहे की, ‘काँग्रेस सुधरणार नाही.. देशहितासाठी पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जातात, तुमच्या गांधींप्रमाणे गुपचूप परदेशात जात नाहीत. प्रीती गांधी नावाच्या ट्विटर हँडलवरून लिहिले गेले आहे की, या ट्विटचं टायमिंग देखील भारीच आहे.