दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला ड्रामा बंद केल्यास, भारतीय जनता पक्ष(भाजप) जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा देईल असे दिल्ली भाजप नेते हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभेत जनलोकपाल संमत झाले नाही तर राजीनामा देण्याचा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.हे विधेयक संमत झाले नाही तर आपल्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
जनलोकपाल मंजूर झाले नाही तर राजीनामा देईन – केजरीवाल
यावर भाजपने आम आदमी पक्षाच्या सरकारने मांडलेल्या जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. हर्षवर्धन आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हणतात की, केजरीवाल यांनी राजीनामा देऊन पायऊतार व्हावे असे भाजप कधीच होऊ देणार नाही. भ्रष्टाचारविरोधात लढण्याचे व जनलोकपाल विधेयकाला पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिलेले आहे. त्यांची जनलोकपालासाठी सुरू असलेली आरडाओरड आणि नाटके बंद करावीत या विधेयकावरून केजरीवाल राजाकारण करत असल्याचेही हर्षवर्धन यांनी ट्विटरवर म्हटले आहे.