Lal Krishna Advani Political Journey : देशातील सर्व राजकीय पक्षांपैकी भारतीय जनता पक्ष हा सध्या सर्वात मोठा पक्ष असल्याचा उल्लेख वारंवार केला जातो. २०१४ भाजपा केंद्रात सत्तेत आला आणि २०१९ साली लोकसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळवत भारतीय जनता पक्षाने केंद्रात सत्ता राखली. २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे २४० खासदार निवडून आले आणि केंद्रात एनडीए आघाडीचं सरकार स्थापन झालं. भारतीय जनता पक्षाला या सर्वोच्च स्थानी पोहोचवण्यात अनेक नेत्यांचा मोलाचा वाटा आहे, यापैकीच एक नेते म्हणजे लालकृष्ण आडवाणी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय जनता पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असल्याचं मानलं जातं. भाजपाच्या यशामध्ये लालकृष्ण आडवाणींचा मोलाचा वाटा राहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भाजपाच्या वाटचालीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेले नेते म्हणून लालकृष्ण आडवाणी यांच्याकडे पाहिलं जातं. रा. स्व. संघाचे (आरएसएस) स्वयंसेवक ते देशाचे उपपंतप्रधान असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. गेल्या काही वर्षांपासून लालकृष्ण आडवाणी त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत. आज आपण त्यांच्या राजकीय प्रवासाबाबत माहिती जाणून घेऊयात…
कराचीत जन्म
लालकृष्ण आडवाणी यांचा जन्म पाकिस्तानच्या कराचीमध्ये ८ नोव्हेंबर १९२७ रोजी एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला. किशनचंद आडवाणी असं त्यांच्या वडिलांचं नाव. आडवाणींचं प्राथमिक शिक्षण कराचीतील एका हायस्कूलमध्ये झालं. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही दिवस कराचीतील एका हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर १९४७ साली देशाची फाळणी झाली आणि त्यावेळी आडवाणी कुटुंब पाकिस्तान सोडून दिल्लीत आलं.
हेही वाचा : Maharashtra News Live Today : “एकतर तू राहशील, नाहीतर मी”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य; रोख कोणाकडे?
राजकीय कारकीर्दीला सुरुवात
दिल्लीत आल्यानंतर लालकृष्ण आडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून स्वयंसेवक म्हणून आपल्या पुढील कारकीर्दीला सुरुवात केली आणि पुढे ते संघाचे प्रचारक झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत असतानाच १९५७ मध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि नवनिर्वाचित खासदारांना मदत करण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर ते जनसंघाच्या खासदारांना त्यांच्या संसदीय कार्यात मदत करू लागले. १९५८ ते १९६३ या दरम्यान त्यांनी दिल्ली प्रदेश जनसंघाचं सचिवपद भूषवलं. १९६० मध्ये त्यांनी साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’मध्ये सहाय्यक संपादक म्हणूनही पदभार सांभाळला. त्यानंतर १९६७ मध्ये त्यांनी पूर्णवेळ राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.
एप्रिल १९७० साली इंद्रकुमार गुजराल यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्याने एक जागा रिक्त झाली होती. जनसंघाने लालकृष्ण आडवाणी यांना त्या जागेसाठी उमेदवारी दिली आणि ते पहिल्यांदा राज्यसभेवर खासदार झाले. राज्यसभेतील त्यांच्या सुरुवातीच्या भाषणात आडवाणींनी राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर भर दिला. १९७२ मध्ये आडवाणी यांची भारतीय जनसंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांना अटक झाली होती.
१९७७ मध्ये जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले आणि २४ मार्च १९७७ रोजी मोरारजी देसाई यांनी भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या सरकारमध्ये अटलजींना परराष्ट्रमंत्री आणि आडवाणींना माहिती आणि प्रसारण मंत्रालय मिळालं होतं. मात्र, जनता पक्षाचं सरकार फार काळ टिकू शकलं नाही. अर्धा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पक्षाला बाहेर पडावं लागलं आणि मोरारजी देसाई यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची निवड झाली तर लालकृष्ण आडवाणी पक्षाचे सरचिटणीस झाले. १९८४ साली भाजपाचा दारुण पराभव झाला, लोकसभेत पक्षाचे फक्त दोनच खासदार निवडून आले. यानंतर १९८६ साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या जागी लालकृष्ण आडवाणी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. १९८६ ते १९९१ या काळात पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आडवाणींनी सांभाळली.
दरम्यान, १९९८ ते २००४ या दरम्यान भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) सरकारमध्ये ते केंद्रीय गृहमंत्री होते. तसेच २००२ ते २००४ या दरम्यान त्यांनी भारताचं उपपंतप्रधानपद भूषवलं. यानंतर २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर त्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पुढे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. २०१५ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून तब्बेतीच्या कारणास्तव लालकृष्ण आडवाणी सक्रिय राजकारणातून अलिप्त आहेत. लालकृष्ण आडवाणी हे भारतीय जनता पक्षाच्या सह-संस्थापकांपैकी एक आहेत. पक्ष स्थापनेनंतर देशभरात पक्षाची संघटना वाढवण्यामध्ये लालकृष्ण आडवाणी यांचं अमूल्य योगदान राहिलं आहे.
राम मंदिरासाठी आंदोलन
१९९० मध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी लालकृष्ण आडवाणी यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात प्रचंड मोठी चळवळ उभारली होती. राम मंदिरासाठी त्यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी राम रथयात्रा काढली होती. मात्र, आडवाणींना मध्येच अटक झाली होती. त्यानंतर आडवाणींची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली गेली. लालकृष्ण अडवाणी यांच्या राम रथयात्रेशिवाय जनदेश यात्रा, भारत सुरक्षा यात्रा, स्वर्ण जयंती रथयात्रा, भारत उदय यात्रा अशा अनेक रथयात्रा त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनात काढल्या.
देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार ३ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. २ एप्रिल २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.