मागील आठवड्याभरामध्ये पेट्रोल आणि डीझेलचे दर प्रती लिटर पाच रुपयांनी वाढले आहेत. असं असतानाच राजस्थानमधील मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे एक मागणी केली आहे. ज्या पद्धतीने भाजपाच्या मंत्र्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ची तिकीटं वाटली तशीच केंद्र सरकारने इंधनासाठी कुपन्स वाटावीत अशी मागणी प्रताप यांनी केलीय.

नक्की वाचा >> पेट्रोल भरण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिक गुजरातमध्ये; दरांमधील फरक पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रताप यांनी हे मत व्यक्त केलंय. “निवडणुकांनंतर भाजपाने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. ते राम भक्त नसून रावण भक्त आहेत. त्यांनी पेट्रोल, डिझेलसाठी कुपन्स वाटली पाहिजेत, ज्याप्रमाणे त्यांच्या मंत्र्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तिकीटं वाटली,” असं प्रताप म्हणाले आहेत.

मागील सात दिवसांपासून भारतामधील इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. पाच राज्यांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून इंधानेच दर स्थीर होते. मात्र मार्च महिन्यामध्ये २० तारखेपासून इंधानेच दर दिवसाला सरासरी ८० पैशांनी वाढू लागले. मागील आठ दिवसांमध्ये सात वेळा इंधनाचे दर वाढले आहेत.

नक्की वाचा >> विश्लेषण : कर आकारण्यात महाराष्ट्र देशात नंबर वन; १०० रुपयांचं पेट्रोल भरल्यास किती कर आकारतात माहितीये का?

याच पार्श्वभूमीवर प्रताप यांनी इंधनदरवाढ आणि सध्या देशभरामध्ये चर्चेत असणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’चा संबंध जोडत भाजपावर निशाणा साधलाय. काश्मीरमधील पंडितांच्या पलायनाच्या कथानकावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ची भाजपाच्या अनेक नेत्यांनी स्तुती केली आहे. अनेक ठिकाणी भाजपा नेत्यांनी संपूर्ण चित्रपटगृहांचं बुकींग करुन हा चित्रपट मोफत दाखवला आहे. जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पहावा असं भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी आतापर्यंत बोलून दाखवलंय.

पंतप्रधान मोदींनीही या चित्रपटचं कौतुक केलंय. भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये करमुक्त झालेल्या ‘कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या वादावर मोदींनी, ‘सातत्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाची बदनामी करत आहे’, असा टोला लगावला.

नक्की वाचा >> विश्लेषण : चित्रपट टॅक्स फ्री होतो म्हणजे काय होतं? तिकिटांचे दर कमी होतात का?; फायदा कोणाला होतो?

काश्मीर खोऱ्यातून १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा मुद्दा भाजपाच्या अजेंड्यावरही राहिलेला आहे. या चित्रपटावर काँग्रेसने तसेच, काही सिनेमा परीक्षकांनी प्रतिकुल मते व्यक्त केली आहेत. या विरोधाचा संदर्भ देत, मोदींनी दोन आठड्यांपूर्वी झालेल्या भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत या चित्रपटाचे समर्थन केले.

नक्की वाचा >> The Kashmir Files च्या मुद्द्यावरुन नितेश राणेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांचा पाठिंबा; म्हणाले, “हा चित्रपट…”

‘हा चित्रपट काश्मिरी पंडितांबाबत कित्येक वर्षे जाणीपूर्वक दडवून ठेवलेले सत्य मांडतो. मात्र, या चित्रपटाची बदनामी केली जात आहे. एखाद्याला हा चित्रपट आवडला नसेल तर त्याला प्रत्युत्तर देणारा वा प्रतिवाद करणारा चित्रपट निर्माण करावा’, असे मत मोदी यांनी भाजपाच्या खासदारांसमोर मांडले.

नक्की वाचा >> ‘द कश्मीर फाइल’ पाहण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘या’ दोन अटींवर मिळणार ‘हाफ डे’; मुख्यमंत्र्यांची घोषणा

कुठलाही सिनेमा चांगला की, वाईट याची नीट समीक्षा केली पाहिजे पण, त्याऐवजी या चित्रपटाविषयी शंका-कुशंका घेतल्या जात असून हे कट-कारस्थान आहे. कुठल्याही विषयावर योग्य मार्गाने सत्याची मांडणी झाली पाहिजे. त्यामुळे चिंता फक्त या चित्रपटाबद्दल नाही. देशाच्या भल्यासाठी सत्य मांडले पाहिजे. संबधित विषयातील एक बाजू एखाद्याला महत्त्वाची वाटू शकते, दुसऱ्याला अन्य एखादी बाजू महत्त्वाची वाटेल. हा चित्रपटातून सत्य मांडले जात असेल तर त्याला विरोध कशासाठी केला जात आहे, असा सवाल मोदींनी केला.

नक्की वाचा >> The Kashmir Files संदर्भातील ‘त्या’ पोस्टमुळे स्वरा भास्करवर अनेकजण संतापले; म्हणाले, “तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला…”

पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांना आर्थिक व लष्करी मदत पुरवली गेली. दहशतवाद्यांनी अनेक काश्मिरी पंडितांची हत्या केली. या हत्यासत्रानंतर काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून पलायन करावे लागले होते. विस्थापित झालेले काश्मिरी पंडित अजूनही खोऱ्यात परत येऊ शकलेले नाहीत. हे सत्य ज्यांना दडपून टाकायचे आहे, तेच या चित्रपटाला विरोध करत आहेत, असे मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp should distribute coupons for fuel the way they gave out the kashmir files tickets rajasthan minister scsg