जयललिता यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मौन पाळले आहे, असेही रमेश म्हणाले.
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारची भूमिका काय आहे, असे सर्व विचारत आहेत. मात्र जयललिता यांच्याविरुद्ध मूळ याचिका भाजपने केली आहे, असे असताना कर्नाटक सरकारच्या खांद्यावर बंदूक का ठेवण्यात येत आहे, असा सवाल रमेश यांनी केला आहे.

Story img Loader