काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी १४ जानेवारी रोजी मणिपूर राज्यातून भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला म्हणजेच भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात केली. त्यानंतर १८ जानेवारी रोजी यात्रेचा आसाम राज्यात प्रवेश झाला. दि. २५ जानेवारी पर्यंत ही यात्रा आसामच्या विविध जिल्यातून मार्गक्रमण करणार आहे. मात्र तत्पूर्वी आसाममधील कडव्या भाजपा सरकाराचा सामना काँग्रेसला करावा लागत आहे. काँग्रेसचे संवाद विभागाचे प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी म्हटले की, आसामच्या सुनीतपूर भागातील जमुगुरीघाट येथून प्रवास करत असताना भाजपा समर्थकांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्याचा एक व्हिडिओ आता काँग्रेसच्या वतीने सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे.

जयराम रमेश म्हणाले की, आम्ही जमुगुरीघाट येथून जात असताना भाजपाचे झेंडे हाती धरलेल्या एका अनियंत्रित जमावाने माझ्या गाडीला घेरले. त्यांनी गाडीला लावलेले भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर फाडून टाकले. तसेच यात्रेविरोधात घोषणाबाजी केली आणि गाडीच्या काचेवर पाणी फेकले. मात्र आम्ही शांत राहून त्यांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

govt employee stabs colleagues
सुट्टी नाकारली, संतापलेल्या कर्मचाऱ्याने चार सहकाऱ्यांवर केले वार; चाकू घेऊन रस्तावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
Three drunken arrested for assaulting policemen
मद्यपींची पोलिसांना धक्काबुक्की; तिघे अटकेत
crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Society confronts reality Water cut for six days
समाज वास्तवाला भिडताना : सहा दिवस पाणी बंद…

अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या माध्यम समन्वयक महिमा सिंह यांनी या घटनेबद्दल एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, आमच्या वाहनांवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. वाहनावरील काँग्रेसचे स्टिकर फाडून टाकत त्यांनी गाडीच्या मागे भाजपाचे झेंडे लावले. आमच्या सोशल मीडिया टीमलाही त्रास दिला. तसेच एका माध्यमकर्मीचा कॅमेरा पळविला. त्यामुळे आम्ही पोलिसांना याठिकाणी घेऊन आलो आहोत. माध्यमांना तरी त्रास देऊ नका, अशी विनंती पोलिसांना केली आहे.

या घटनेनंतर सोनितपूरच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक मधुरिमा दास म्हणाल्या की, काँग्रेसच्या ताफ्यावर काहींनी हल्ला केला असे आम्ही ऐकून आहोत. त्या प्रकरणी आम्ही चौकशी करत आहोत.

शनिवारी (दि. २० जानेवारी) खासदार जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सर्मा यांच्यावर टीका केली होती. आसामचे भाजपाच सरकार आमच्या यात्रेमध्ये अडचणी निर्माण करत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. “भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकतेच ज्या मार्गाने गुवाहाटीला प्रवास केला होता, त्या मार्गावरून आमचीही यात्रा शांतपणे जाऊ द्यावी”, अशी मागणी जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत केली.

गुरुवारी (दि. १८ जानेवारी) जेव्हा भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये प्रवेश करत होती, तेव्हा मुख्यमंत्री सर्मा यांनी काँग्रेसवर टीका केली होती. “गांधी कुटुंब हे या देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. तसेच ही त्यांची न्याय यात्रा नसून मियाँ यात्रा आहे. जिथे जिथे मुस्लीम समुदाय आहे, त्या त्या ठिकाणी ते भेटी देतात”, अशी टीका मुख्यमंत्री सर्मा यांनी केली होती. आसाममध्ये बांगलादेशमधून आलेल्या लोकांना मियाँ असे संबोधले जाते.

Story img Loader