भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च निर्णय घेणा-या मंडळाची बैठक मंगळवारी होत असून, या मंडळावर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
कर्नाटकविषयी चर्चा करण्यासाठी याआधी बोलावण्यात आलेल्या केंद्रीय निवड समिती आणि संसदीय मंडळाच्या बैठकांना मोदी गैरहजर होते. मंगळवारी होणा-या या बैठकीत पुढील वर्षी होणा-या सार्वजनिक निवडणुकांसाठी डावपेच आखण्यावर चर्चा होणार आहे.
पुढील महीन्यात ८-९ जूनला गोव्यामध्ये होणा-या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीमध्ये निवडणूक मोहीमेसाठी मोठ्या प्रमाणावर डावपेच आखण्यात येणार असून, निवडणुकीसाठी पक्ष कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. त्यावेळी नवे कार्यालय समन्वयक निवडून त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदा-या देण्यात येणार आहेत.
येऊ घातलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाच्या दृष्टीने गोव्याची बैठक भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे. दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकांच्या निकालांवर भाजपच्या पुढील सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर मध्ये निवडल्या जाणा-या कार्यकारीणीत कोण-कोण असणार ते ठरणार आहे.
परिणामी पक्ष सूत्रांनी दावा केला की, येत्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पक्ष नेतृत्वाने पक्षाची निवडणुक मोहीम चालवण्यासाठी डावपेच आखून पक्षाच्या केंद्रीय कार्यकारीणी समोर ठेवणे आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा