राष्ट्रगीत सुरू असताना मोबाईलवर बोलणारे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना शनिवारी भाजपकडून लक्ष्य करण्यात आले. ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवेळी हा प्रकार घडला होता. यावेळी राष्ट्रगीत सुरू असल्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते शांतपणे उभे असताना फारूख अब्दुल्ला उभे राहून आपल्या मोबाईलवरून कोणाशी तरी बोलते होते. या प्रकारामुळे फारूख अब्दुल्ला यांच्यावर चौफेर टीका झाली होती. यावेळी फारूख अब्दुल्ला फुटीरतावाद्यांना त्यांच्या राष्ट्रगीताविषयी विचारत होते का, अशी टीका आज भाजपकडून करण्यात आली. अब्दुल्ला यांना राष्ट्रगीतापेक्षा मोबाईलवर बोलण्यात जास्त रस वाटला. यावेळी ते फुटीरतावाद्यांशी त्यांच्या राष्ट्रगीताविषयी चर्चा करत होते का? कारण, राष्ट्रगीताचा अपमान हा आपल्या देशाचा सर्वात मोठा अपमान आहे, असे भाजप नेत्या शायना एनसी यांनी म्हटले.
राष्ट्रगीत सुरू असताना फुटीरतावाद्यांशी बोलत होतात का; फारूख अब्दुल्लांवर भाजपची टीका
ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवेळी हा प्रकार घडला होता.
First published on: 28-05-2016 at 14:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp to farooq abdullah were you talking to separatists during national anthem