राष्ट्रगीत सुरू असताना मोबाईलवर बोलणारे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांना शनिवारी भाजपकडून लक्ष्य करण्यात आले. ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवेळी हा प्रकार घडला होता. यावेळी राष्ट्रगीत सुरू असल्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते शांतपणे उभे असताना फारूख अब्दुल्ला उभे राहून आपल्या मोबाईलवरून कोणाशी तरी बोलते होते. या प्रकारामुळे फारूख अब्दुल्ला यांच्यावर चौफेर टीका झाली होती. यावेळी फारूख अब्दुल्ला फुटीरतावाद्यांना त्यांच्या राष्ट्रगीताविषयी विचारत होते का, अशी टीका आज भाजपकडून करण्यात आली. अब्दुल्ला यांना राष्ट्रगीतापेक्षा मोबाईलवर बोलण्यात जास्त रस वाटला. यावेळी ते फुटीरतावाद्यांशी त्यांच्या राष्ट्रगीताविषयी चर्चा करत होते का? कारण, राष्ट्रगीताचा अपमान हा आपल्या देशाचा सर्वात मोठा अपमान आहे, असे भाजप नेत्या शायना एनसी यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा