उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसून येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेशमध्ये दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. त्यांनी अनुपशहर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, “मला खात्री आहे की, यावेळीही उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली योगी आदित्यनाथ दोन तृतीयांश बहुमताने मुख्यमंत्री बनणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्व माफिया एकतर तुरुंगात आहेत, राज्य सोडून गेले आहेत किंवा समाजवादी पक्षाच्या उमेदवारांच्या यादीत आहेत,” असं म्हणत त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.

Amit Shah Said This Thing About UCC
Amit Shah : UCC बाबत अमित शाह यांची मोठी घोषणा, आदिवासी बांधवांना काय दिलं आश्वासन?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
maharashtra vidhan sabha election 2024 path of Mahayuti and Mahavikas Aghadi is difficult due to major rebel candidates in akola and vashim
प्रमुख बंडखोरांमुळे महायुती व मविआची वाट बिकट
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
gang vandalised 13 vehicle in aundh
ऐन दिवाळीत टोळक्याची दहशत; १३ वाहनांची तोडफोड- ओैंधमधील महापालिका वसाहतीतील घटना
maharashtra assembly election 2024 Congress High Command started efforts for the return of the rebels in gondia
‘हायकमांड’चा आदेश अन् गोंदियातील काही बंडखोर नरमले, तर काही ठाम
Ratan Tata Successful businessman with social consciousness
रतन टाटा : सामाजिक जाणीव राखणारा यशस्वी उद्योगपती
congress mallikarjun kharge on ups
‘पंतप्रधान मोदींचा हलक्या दर्जाचा प्रसिद्धीचा प्रयत्न’, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका; ‘एक्स’वरील पोस्टवरून दोघांमध्ये उडाले खटके

“आम्ही पश्चिम उत्तर प्रदेशला माफियांपासून मुक्त करू, असे सांगितले होते आणि आम्ही सांगितले तेच केले आहे. आज संपूर्ण उत्तर प्रदेशातील एकाही माफियामध्ये काहीही चुकीचे करण्याची हिंमत नाही. माता-भगिनी पूर्णपणे सुरक्षित आहेत. गेल्या पाच वर्षांत भाजपाच्या राजवटीत माफियांचे पलायन झाले आहे. उत्तर प्रदेशातील माफिया आता फक्त तीन ठिकाणी आहेत. राज्याबाहेर, तुरुंगात किंवा अखिलेश यादव यांच्या यादीत आमदार होण्यासाठी उत्सुक. आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांना सरळ करण्याचे काम केले आहे,” असं शाह म्हणाले.

उत्तर प्रदेशच्या परिवर्तनासाठी पक्षाने काम केले असून देश सुरक्षित करण्याचे काम मोदींनी केले आहे, असे शाह सभेत बोलताना म्हणाले. “त्यांच्या प्रियजनांवर छापे टाकून कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत. ते पैसे सपाच्या गुंडांचे आहेत. भाजपाने उत्तर प्रदेशचा कायापालट करण्याचे काम केले आहे. पंतप्रधान मोदींनी देश सुरक्षित करण्याचे काम केले आहे. उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास तर मोदींचे हात बळकट होतील,” असा दावा त्यांनी केला.