नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या वर्षीही देशभर ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रम आयोजित केला जाणार असून त्याचा वापर भाजपच्या कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणूक आणि पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये सक्रिय करण्यासाठी केला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सेवा पंधरवडय़ा’च्या आखणीसाठी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महासचिवांची महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर नड्डा यांनी बुधवारी लोकसभा व राज्यसभेतील भाजपच्या खासदारांशीही संवाद साधल्याचे समजते. दरवर्षी मोदींच्या वाढदिवसापासून (१७ सप्टेंबर) गांधी जयंतीपर्यंत ‘सेवा पंधरवडा’ या कार्यक्रमाअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या वर्षी ‘सेवा ही संघटना’ या उपक्रमामध्ये गावागावांमधील भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या दृष्टीने अधिक सक्रिय केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या लोककल्याणाच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याच्या सूचना पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> “…तर मोदी सरकार मोफत गॅस सिलिंडर देईल”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत

काय करणार?

* आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदारांना गावा-गावांमध्ये जाऊन लोकसंपर्काचे काम देण्यात आले आहे.

* भाजपने ३० जुलैपासून सुरू केलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमाचा आढावा नड्डांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. स्वातंत्र्यलढय़ात वीरमरण प्रत्करणाऱ्या शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ‘सेवा पंधरवडय़ा’त या मोहिमेवरही चर्चा केली जाणार आहे.

* भाजपच्या भविष्यकालीन योजनांची माहितीही लोकांपर्यत पोहोचवली जाणार आहे.

* देशभर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबिरे घेण्याचे आदेशही स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. देशभर स्वच्छता मोहिमेला पुन्हा गती दिली जाईल.

* जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये विविध प्रकारची प्रदर्शने भरवली जातील. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp to organize seva pakhwara for 15 days on pm narendra modi 73rd birthday zws