लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. देशातील सर्वच पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. दरम्यान, सत्ताधारी भाजपानेदेखील तयारीला सुरुवात केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून २९ फेब्रुवारी रोजी भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या पहिल्या यादीवर चर्चा करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रात्री उशिरापर्यंत बैठक

पीटीआयच्या वृत्तानुसार २९ फेब्रुवारी रात्री १०.३० वाजता या बैठकीला सुरुवात झाली होती. पुढे साधारण चार तास ही बैठक चालली. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित हेते. आगामी एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

पहिल्या यादीत १६० उमेदवारांची घोषणा?

भाजपाच्या अंतर्गत सूत्रानुसार या बैठकीत उमेदवारांच्या पहिल्या यादीवर चर्चा करण्यात आली. या यादीत साधारण १६० उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. वेगेवगळ्या राज्यांतील सर्वोच्च नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे दिल्लीला पाठवण्यास याआधीच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत कोणाकोणाचा समावेश असणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.