देशातील जनतेच्या मूलभूत हक्कांवर र्निबध आणण्याचा भाजप सरकार प्रयत्न करीत असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केला आहे. देशावर एकच विचारसरणी लादण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असेही गोगोई म्हणाले.

देशांत विविध विचारसरणींची जनता आहे, मात्र संघ परिवाराच्या आदेशावरून भाजप एकच विचारसरणी लादण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु वैविध्यतेने नटलेल्या भारतात ते शक्य नाही, असेही गोगोई यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

देशातील नागरिकांच्या विचारस्वातंत्र्यावर आणि मूलभूत हक्कांवर र्निबध आणून भारतीय जनता पक्षाने राज्यघटनेवरच हल्ला चढविला आहे आणि ही बाब कदापी सहन केली जाणार नाही, असेही गोगोई यावेळी म्हणाले.

Story img Loader