मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठवली असतानाच शनिवारी भाजपानेही मनसेवर ट्विटरवरुन पलटवार केला आहे. दिवसाढवळ्या मराठी तरुणांना मारहाण करणारे कार्यकर्ते आणि रात्री सभांमधून लोकशाहीचा नकली टेंभा मिरवणारे पक्षाध्यक्ष, अशा शब्दात भाजपाने मनसेचा समाचार घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा ठरत आहे. पुराव्यांसकट राज यांनी केलेले ‘स्मार्ट’ भाषण लोकांना आकर्षित करत आहे. यावरुन भाजपानेही आता मनसेवर पलटवार केला आहे.शनिवारी दुपारी भाजपाने मनसेचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. मनसेचे कार्यकर्ते एका तरुणाला मारहाण करतानाची बातमी या व्हिडिओत दाखवण्यात आली आहे. या ट्विटमध्ये भाजपाने म्हटलंय की, दिवसाढवळ्या मराठी तरुणांना मारहाण करणारे कार्यकर्ते आणि रात्री सभांमधून लोकशाहीचा नकली टेंभा मिरवणारे पक्षाध्यक्ष. वा रे मनसे. लाव रे व्हिडिओ, लाज कशी नाही वाटत.

भाजपाने ट्विटरवर लाव रे व्हिडिओ अशी मोहीम सुरु करत मनसेवर निशाणा साधला आहे. गुरुवारी रात्री भाजपाने पहिला व्हिडिओ ट्विट केला होता. डोंबिवीलीत मनसे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर फेरीवाल्यांनी केलेल्या आरोपांसंदर्भातील बातमी भाजपाने ट्विट केली होती. शुक्रवारी दुपारी भाजपाने आणखी एक व्हिडिओ ट्विट केला. यात मनसेची पदाधिकारी साडी चोरतानाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp tweets old video of mns jibe at party chief raj thackeray lav re video