भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ९६ वर्षांच्या आडवाणी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.

तीन महिन्यापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने भारत रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला होता. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती जगदीप धनकड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लालकृष्ण अडवाणी यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Economist Amartya Sen
“भारत हिंदू राष्ट्र नाही”, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निवडणूक विश्लेषण!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”

लालकृष्ण अडवाणी यांनी जून २००२ ते मे २००४ या काळात देशाचे उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले होते. तसेच ऑक्टोबर १९९९ ते मे २००४ या काळात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. तसेच भाजपा संघटनेसाठीही त्यांनी वेळोवेळी योगदान दिले होते. १९८६ ते १९९०, १९९३ ते १९९८, २००४ ते २००५ असे तीन वेळा त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले होते.