लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी इंडिया आघाडीच्या विजयाचा दावा केला आहे. काँग्रेस सर्व जागा प्रचंड मतांनी जिंकणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय भाजपाच्या ४०० जागा पार करण्याच्या घोषणेचाही त्यांनी समाचार घेतला. “खरं तर सध्याच्या ट्रेंडबद्दल मी काहीही सांगू शकत नाही, परंतु मला वाटते की, जनतेला जो निर्णय घ्यायचा होता, तो त्यांनी घेतला आहे, असंही पवन खेडा म्हणाले. आयएएनएसकडे पवन खेडा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काँग्रेस नेते पवन खेरा पुढे म्हणाले की, “४०० जागा पार करण्याचा नारा देणारा भाजपा शेअर बाजार वाढेल म्हणून सांगत होता. आता त्यांनाही त्याचे खरे वास्तव कळायला समजायला हवे. जनतेचा खरा मूड काय आहे? हे आता सगळ्यांना समजलं आहे.
हेही वाचाः “…तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका”, कपिल सिब्बल असं का म्हणाले?
वाराणसीतील दोन फेऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे पडलेले दिसले, तर त्यावरून सध्या देशाचा मूड काय आहे हे स्पष्टपणे दिसून येतेय. सध्याच्या ट्रेंडबद्दल मी निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही. एक अतिशय सुरुवातीचा ट्रेंड म्हणून मी म्हणेन की, सध्या आपण सर्वांनी प्रतीक्षा केली पाहिजे, परंतु हे ट्रेंड भविष्यात आपल्या बाजूने निकाल देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. तसेच पवन खेडा यांनी पंजाबमधील सध्याची राजकीय परिस्थिती काँग्रेसच्या बाजूने असल्याचं सांगितलं आहे. पंजाबमध्ये आम्हाला चांगल्या जागा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd