आता महिलांनी सत्तेचा गाडा हाकायचा असून पुरुषांनी घरात बसण्याचे दिवस आले आहेत. सत्तेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी भाजपने मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत ५० टक्के महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
‘अटल ज्योती अभियाना’च्या कार्यक्रमात बुधवारी त्यांनी ही घोषणा केली. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतील निकालाचा वर्षांअखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेशच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader