सतत वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आता एक हास्यास्पद वक्तव्य केलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांचं २५ मिनिटांचं भाषण आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चणरही स्पर्श केले. बिहारच्या नवादा येथे आज भाजपाची मोठा सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात नितीश कुमार यांनी जवळपास २५ मिनिटे भाषण केलं. हे भाषण अत्यंत कंटाळवाणं आणि अनेक चुकीच्या शब्दांनी भरलेलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावरहीया भाषणाच्या क्लिप्स आता व्हायरल झाल्या आहेत. दरम्यान, भाजपाकडे ४००० पेक्षा जास्त खासदार असतील, असा हास्यास्पद विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले

“आपण यापेक्षाही पुढे जाऊ. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊच. पुढच्या पाच वर्षांत काहीच अडचण येणार नाही. मला खात्री आहे की चार हजारपेक्षा जास्त खासदार भाजपात असतील”, असं नितीश कुमार म्हणाले.

तसंच, व्यासपीठावर नितीश कुमार हे नरेंद्र मोदींच्या शेजारीच बसले होते. या दोघांमध्ये चर्चा सुरू असताना नितीश कुमारांनी नरेंद्र मोदींचे चरणस्पर्श केले. त्यांचा हा व्हीडिओही तुफान व्हायरल झाला आहे.

दरम्यान, भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४०० पारचा नारा दिला आहे. असे असतानाही मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने ४ हजारचा उल्लेख केल्याने त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा विधानसभेतील एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी लोकसंख्या वाढीला स्त्रीयांना जबाबदार धरलं होतं. मुली शिकल्या तर लोकसंख्या कमी होईल, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून सभागृहात आणि सभागृहा बाहेर बराच गोंधळही झाला होता.

Story img Loader