जगाला करोनाचं संकट भेडसावतं आहे. भारतातही करोनाची साथ आहेच. अशावेळी पहिल्यांदाच बिहार हे राज्य निवडणुकीला सामोरं जातं आहे. असं असलं तरीही बिहारच्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. एवढंच नाही तर बिहारचं नितीशकुमार सरकार आणि सुशील मोदी यांनी केलेलं कामही लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे करोना काळ असला तरीही बिहार निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेवर येऊ असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. त्यामुळे ते सध्या बिहारमध्ये आहेत. दरम्यान आजच बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.

आणखी वाचा- बिहार विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; १० नोव्हेंबरला लागणार निकाल

दरम्यान आजच बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

आणखी वाचा- करोना रुग्णांनाही करता येणार मतदान; निवडणूक आयोगानं केली खास व्यवस्था

हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, पुन्हा एकदा आम्हीच बिहार जिंकू असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Story img Loader