नवी दिल्ली : सात राज्यांत विधानसभेच्या १३ जागांवरील पोटनिवडणुकीत विरोधकांच्या इंडिया आघाडीने दहा जागा जिंकल्या. भाजपला केवळ दोन ठिकाणी विजय मिळाला. तर बिहारमध्ये अपक्ष उमेदवाराची सरशी झाली. लोकसभा निकालानंतर भाजपसाठी हा धक्का मानला जातो.

पश्चिम बंगालमधील सर्व चार जागा सत्तारूढ तृणमूल काँग्रेसकडे गेल्या. विशेष म्हणजे यातील तीन जागा यापूर्वी भाजपकडे होत्या. मात्र आमदारांनी पक्ष बदलल्याने येथे पोटनिवडणूक झाली. रायगंज, रानघाट दक्षिण, बागडा तसेच मनिकटला या चारही मतदारसंघात ५० हजारांहून अधिक मताधिक्याने तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला. त्यावरून राज्यातील पक्षाचे यश लक्षात येते.

Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
mahesh gaikwad
कल्याण : फरार मारेकऱ्यांना पकडण्यासाठी महेश गायकवाड यांचे २५ हजार रूपयांचे बक्षिस
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन

उत्तरखंडमध्ये काँग्रेसची सरशी

उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ व मंगलौर या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवत सत्तारूढ भाजपला धक्का दिला. लखपालसिंह बुटाला यांनी बद्रीनाथ मतदारसंघात माजी मंत्री व भाजप उमेदवार राजेंद्रसिंह भंडारी यांचा पाच हजार मतांनी पराभव केला. तर मंगलौरमध्ये काँग्रेसच्याच निजामुद्दीन यांनी ४२२ मतांच्या निसटत्या फरकाने भाजप उमेदवाराचा पराभव केला. मध्य प्रदेशमध्ये भाजपला यश मिळाले. अमरवरा येथे भाजपच्या कमलेश प्रताप शहा यांनी तीन हजार मतांनी काँग्रेसच्या धरीन सह इनवती यांचा पराभव केला. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे हे प्रभावक्षेत्र मानले जाते.

हेही वाचा >>> विधान परिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव; मित्रपक्षांच्या नाराजीचा फटका

बिहारमध्ये प्रमुख पक्षांना धक्का

बिहारच्या रुपैली मतदारसंघात अपक्ष शंकर सिंह विजयी झाले. त्यांनी संयुक्त जनता दलाच्या कलाधर प्रसाद मंडल यांचा पराभव केला. येथे राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेला. तमिळनाडूत द्रमुकने मोठ्या फरकाने विक्रवंडी मतदारसंघातील जागा राखली. येथे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकने निवडणुकीत भाग घेतला नव्हता. पंजाबच्या जालंधर पश्चिम मतदारसंघात सत्तारूढ आम आदमी पक्षाच्या मोहिंदर भगत यांनी भाजपच्या शीतल अंगरुल यांचा पराभव केला. त्यांनी आपचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे. पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत आपची कामगिरी चांगली झाली नव्हती. त्यामुळे हा विजय त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला.

पोटनिवडणूक निकाल

एकूण जागा १३ : ●तृणमूल काँग्रेस  ●काँग्रेस ४ ●भाजप २ ●द्रमुक, आप, अपक्ष प्रत्येकी १

देशभरातील राजकीय वातावरण बदलत असल्याचे या निकालातून दिसते. – जयराम रमेशकाँग्रेस सरचिटणीस

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी विजयी

हिमाचल प्रदेशातील तीन जागांपैकी सत्तारूढ काँग्रेसला दोन तर भाजपला एक जागा मिळाली. मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुख्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी डेहरा मतदारसंघात भाजप उमेदवार होशियार सिंह यांचा ९ हजार मतांनी पराभव केला. नलगड येथील जागाही काँग्रेसला मिळाली. भाजपला केवळ हमीरपूर मतदारसंघात यश मिळाले.

Story img Loader