पीटीआय, भुवनेश्वर

ओडिशा म्हणजे नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाचा (बिजद) बालेकिल्ला. २००० सालापासून या राज्यात बिजदचीच सत्ता होती. अगदी लोकसभा निवडणुकांमध्येही या राज्यात याच पक्षाची सरशी होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत नवीनबाबूंच्या या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा धक्का दिला. ओडिशातील लोकसभेच्या २१ जागांपैकी भाजपने २० जागांवर विजय मिळवला, तर बिजदला एकही जागा मिळाली नाही.

Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!
Chandrababu Naidu with NDA Lok Sabha Election Result 2024
Video: चंद्राबाबूंच्या ‘त्या’ विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या; म्हणाले, “मी या देशात अनेक राजकीय बदल पाहिले आहेत”!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Madhya Pradesh is possible for BJP to pass two hundred
मध्य प्रदेशमुळे भाजपला दोनशे पार शक्य
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
chirag paswan meets nitish kumar
Video: चिराग पासवान सर्व खासदारांसह नितीश कुमारांच्या भेटीला; बिहारमध्ये घडामोडींना वेग, ‘इंडिया’त सत्तास्थापनेच्या हालचाली?
AAP and Congress defeated in Delhi BJP wins lok sabha election
दिल्लीत भाजपचा विजयरथ रोखण्यात अपयश

एकेकाळचा भाजपचा मित्रपक्ष असलेल्या बिजदची यंदाच्या निवडणुकीपूर्वी भाजपबरोबर आघाडी करण्याची चर्चा सुरू होती. मात्र जागावाटप आणि प्रदेश भाजप नेत्यांच्या विरोधामुळे दोनही पक्षांची आघाडी आकारास येऊ शकली नाही. त्यामुळे या राज्यात भाजपविरोधात बिजद अशीच लढत पाहायला मिळाली. ओडिशाच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत भाजपने निवडणुकीत पटनाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. २४ वर्षे मुख्यमंत्री असलेल्या पटनाईक यांना मातृभाषा येत नसल्याचा मुद्दा भाजपने प्रचारात वारंवार मांडला. तसेच त्यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरवण्यात आल्या़ त्याचा फटका बिजद पक्षाला बसला़ केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत पांडा महत्त्वाच्या उमेदवारांनी ओडिशामध्ये विजय मिळवला.

हेही वाचा >>>नरेंद्र मोदींसाठी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची पोस्ट; खास फोटो शेअर करत म्हणाल्या, “आपण एकत्र काम करू, शेवटी..”

प्रथमच भाजपचे सरकार

१४७ विधानसभेच्या जागा असलेल्या ओडिशा विधानसभेत भाजपने प्रथमच सत्ता मिळवली आहे. भाजपने ८० जागांवर विजय मिळवला आहे, तर सत्ताधारी बिजद पक्षाला ४९ जागा मिळाल्या आहेत. पाच वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या नवीन पटनाईक हिंजिली मतदारसंघातून विजयी झाले असले तरी त्यांना सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी ओडिशातील जनतेने दिली नाही.

विक्रम प्रस्थापित करण्यास अपयश

२००० सालापासून ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या नवीन पटनाईक यांचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचे स्वप्न भंगले. ‘सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट’चे प्रमुख पवनकुमार चामलिंग यांनी २४ वर्षे १६५ दिवस सिक्कीमचे मुख्यमंत्रीपद सांभाळले, तर पटनाईक हे २४ वर्षे ९१ दिवस मुख्यमंत्रीपदी होते. विधानसभेत बिजू जनता दलाची सत्ता आली असती तर ७७ वर्षीय पटनाईक यांना हा विक्रम करता आला असता. माकपचे ज्योती बसू २३ वर्षे १३७ दिवस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी होते.