वृत्तसंस्था, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळूनही महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. या यशामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि भाजपविरोधात प्रभावी प्रचार करण्यात विरोधकांना आलेले अपयश हे महत्त्वाचे मुद्दे असल्याचे ‘दी मॅट्रीझ’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांचा प्रभाव अजूनही नागरिकांमध्ये कायम असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.

Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
raj Thackeray
…अन् राज ठाकरे यांनी घरी बोलावले; गंधर्व कलामंचच्या कलाकारांचे कौतुक

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांत अधिक जागा मिळविण्यात भाजपला अपयश आले. महाराष्ट्रात ४८ पैकी महायुतीला १७ व भाजपला ९ जागा जिंकता आल्या, तर हरियाणात १० पैकी पाच जागांवर भाजपला यश मिळाले. मात्र सहाच महिन्यांमध्ये या दोनही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश संपादन करून या राज्यांत सरकारेही स्थापन केली.

हेही वाचा >>>डॉ.आंबेडकर यांच्याविरोधातील वक्तव्याचे गुजरातमध्येही पडसाद; अमित शाहांची प्रमुख उपस्थिती असलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार!

‘दी मॅट्रीझ’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि विरोधकांचा अपप्रचार रोखण्यात आलेले यश यांमुळे भाजपला सत्ता मिळाल्याचे दिसून आले. हे सर्वेक्षण २५ नोव्हेंबर २०२४ ते १४ डिसेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रात ७६,८३० आणि हरियाणामध्ये ५३,६४७ नागरिकांशी चर्चा करून करण्यात आले आहे. या संस्थेने दोन निवडणुकांदरम्यान मतदारांच्या भावनेतील बदलांवरही प्रकाश टाकला आहे.

सर्वेक्षणात काय?

● महाराष्ट्रात सर्वेक्षण केलेल्या ५५ टक्के मतदारांना पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे, हरियाणातील सर्वेक्षण केलेल्या ५३ टक्के मतदारांनी पंतप्रधान मोंदींचा करिष्मा असल्याचे सांगितले.

● राज्यघटना बदलाचा मुद्दा तसेच स्थानिक मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात काँग्रेस अपयशी. हरियाणा विधानसभा निवडणुकीत शेतीविषयक कायदे, महिला कुस्तीपटू अत्याचार आदी मुद्दे पुढे ढकलण्याचे काँग्रेसचे प्रयत्न कुचकामी.

● लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याची चूक विधानसभा निवडणुकीत दुरुस्त केल्याचे अनेक मतदारांनी सांगितले. या बदलामागील प्रमुख कारण म्हणजे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर आणि केंद्र सरकारच्या कृतींवरील वाढता विश्वास.

● विधानसभा निवडणुकीत भाजपच्या संदेशवहनाचा प्रभावशाली प्रभाव. ‘एक है तो सेफ है’ यासारख्या घोषणांना मतदारांनी उचलून घेतले. या प्रचारामुळे दोन्ही राज्यांत भाजपला अधिक मतदान झाले.

● स्थानिक समस्या आणि कल्याणकारी योजनांवर भाजपने लक्ष केंद्रित केल्याने मतदारांचा पाठिंबा मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही राज्यांमध्ये विशेषत: कृषी, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात सरकारच्या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम.

Story img Loader