* पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची करत भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची पंतप्रधानांच्या निवासस्थाना बाहेर जोरदार निदर्शने केली. दिवसेंदिवस यूपीए सरकारच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर येत असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपचे अनुराग ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेब रोड परिसरातून पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत मोर्चाला सुरूवात केली. त्यानंतर दिल्ली भाजपचे प्रमुख विजय गोयल सुद्धा आपल्या समर्थकांसह या मोर्चात सहभागी झाले आणि सर्वांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने केली. जमावाला थोपविण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा करण्यात आला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची संख्या पाहता पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Story img Loader