निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळण्यात भाजपला अपयश आले, ही वस्तुस्थिती दडवून ठेवण्यासाठी त्यांनी फुटीरतेचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र २०१५ मध्ये भाजपचा विजयरथ बिहारमध्ये रोखला जाईल, असे जद(यू)चे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी म्हटले आहे.
‘भाजप का धीरे धीरे हवा निकल रहा है, २०१५ में पाखंड का पराजय होगा’, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे. काळा पैसा, नोकऱ्या आणि बिहारला विशेष दर्जा आदी आश्वासने सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने दिली होती, असेही ते म्हणाले.
सदर आश्वासने बासनात गुंडाळून भाजपने आता काही भगव्या संघटनांना हाताशी धरून फुटीरतेचा मार्ग चोखाळला आहे. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणे, धर्मातर करणे असे प्रकार भाजप करीत आहे, असेही ते म्हणाले.
जुना जनता परिवार एकत्र येण्याबद्दल विचारले असता नितीशकुमार म्हणाले की, जनता परिवारातील पक्षांचे विलीनीकरण निश्चित आहे, त्यासाठी लागणारी औपचारिकता पूर्ण झालेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा