काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान आणि अन्य चार अभिनेत्यांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्याची अनुमती मागणारी राजस्थान सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने सलमान खान याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
तथापि, वन्यजीव संरक्षण कायद्याखाली सलमान खान याच्यासह अन्य आरोपींवर ठेवण्यात आलेला आरोप सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. सलमान खान याच्यावर दंगल माजविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सत्र न्यायालयाने ते कलम रद्द केले असून उच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांच्याविरुद्ध लावलेली दंगलीची कलमे रद्द करण्याच्या आदेशाला आव्हान देणारी राजस्थान सरकारची याचिका न्या. पी. सदाशिवम, न्या. जे. एस. केहार आणि न्या. विक्रमजित सेन यांच्या पीठाने फेटाळली.

Story img Loader