पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी झारखंडमधील पलामू जिल्ह्य़ात सभा होत असून त्यांना काळे झेंडे दाखवले जाऊ नयेत, यासाठी सभास्थानी कोणत्याही प्रकारचे काळे कपडे घालून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. हा नियम सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही लागू आहे. पलामू पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. राज्यात गेले तीन महिने कंत्राटी शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्याकडून मोदी यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मोदींच्या सभेत काळ्या कपडय़ांना मनाई!
पलामू पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. राज्यात गेले तीन महिने कंत्राटी शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 02-01-2019 at 02:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black clothes prohibited in modis meeting