स्विस बँकेत गुप्तपणे पैसा ठेवलेल्या ज्या खातेदारांची स्वित्झर्लण्डमध्ये चौकशी सुरू आहे, त्यांची नावे उघड करण्याचा निर्णय स्वित्झर्लण्ड सरकारने घेतला असून या खातेदारांमध्ये स्नेहलता साहनी व संगीता साहनी या दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. या दोन खातेदारांना १२ मे रोजी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.
संबंधित खातेदारांची नावे व त्यांच्या जन्मतारखांचे तपशील संदर्भासाठी वापरण्यात येणार आहेत. मात्र, या दोन महिलांचा अधिक तपशील स्विस सरकारने दिलेला नाही. करविषयक झालेल्या करारानुसार,आपल्या खात्याच्या तपशिलासंबंधी भारतीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात येऊ नये, असे संबंधित महिला खातेदारांना वाटत असेल तर त्यांनी येत्या ३० दिवसांत स्वित्झर्लण्डमधील ‘फेडरल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह’ न्यायालयात या प्रकरणी आपले अपील दाखल करावे, अशी सूचना ‘स्विस फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ने केली त्यांना केली आहे.
या दोन महिलांखेरीज, ब्रिटिश, स्पॅनिश व रशियन खातेदारांसंबंधीही अशीच बाब असून अमेरिकी व इस्रायली खातेदारांची नावे मात्र उघड करण्यात आलेली नाहीत. ‘स्विस फेडरल गॅझेट’मध्ये ४० जणांना या प्रकरणी अंतिम नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.

Story img Loader