ब्लॅकबेरीच्या नव्या श्रेणीतील ९७२० हा स्मार्टफोन गुरुवारी भारतीय बाजार पेठेत दाखल झाला. या हॅण्डसेटची किंमत १५,९९० इतकी आहे. ब्लॅकबेरीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सुनील लालवाणी यांनी हा फोन भारतात सादर केला. देशातील शहरांमधील तरुणांचा विचार करून हा स्मार्टफोन तयार करण्यात आल्याचे लालवाणी यांनी सांगितले. ब्लॅकबेरी ७.० ऑपरेटिंग सिस्टिम ग्राहकांना विशेष आवडल्यामुळे या फोनमध्येही तिच वापरण्यात आलीये.
ब्लॅकबेरी ९७२० स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
२.८ इंचाचा टचस्क्रिन डिस्प्ले आणि सोबत की-पॅड
ब्लॅकबेरी ७.१ ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर. यामुळे केवळ स्वाईप करून फोन अनलॉक करता येणार आणि अनलॉक असताना फोनचा कॅमेरा वापरण्याची सुविधा
वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध
सर्व सोशल नेटवर्किंग ऍप्सचा समावेश
बीबीएम की आणि बीबीएम व्हॉईस या दोन्ही नव्या सुविधांचा समावेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा