किर्गिझस्तानमधील चीनच्या दूतावासानजीक मंगळवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात अनेकजण ठार आणि जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जखमी आणि मृतांची नेमकी संख्या अद्यापपर्यंत समजू शकलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, बिशकेक येथील चीनी दुतावासाच्या प्रवेशद्वारजवल हा प्रकार घडला. स्फोटकांनी भरलेली एक कार दुतावासाच्या प्रवेशद्वारावर जाऊन आदळली आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटात कारमधील चालक ठार झाला आहे. हा आत्मघाती दहशतवादी हल्ला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून स्थानिक सुरक्षायंत्रणांकडून या स्फोटाचा तपास सुरू आहे.

सविस्तर वृत्त थोड्यावेळात…