इंफाळमधील लम्खई भागात सुरक्षा दलाला लक्ष्य करुन दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात तीन जण जखमी झाले आहेत. आज (बुधवार) सकाळी दहाच्या सुमारास हा स्फोट झाला. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांतर्फे प्राथमिक तपास सुरु असून, संशयीत व्यक्तिंना ताब्यात घेण्यात आले आहे. सुरक्षा दलाच्या जवानांचा या रस्त्यावर नेहमी राबता असल्याने या ठिकाणी हा स्फोट घडवून आणला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Story img Loader