पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील अशांत टापूत एका मशिदीजवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटात शुक्रवारी १२ जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
खैबर-पख्तूनख्वा प्रांतात हंगू शहरात पट बाजार येथील मशिदीजवळ हा शक्तिशाली स्फोट झाला. शुक्रवारी दुपारी नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम भाविक मशिदीबाहेर पडत असतानाच हा स्फोट झाला. मशिदीजवळ ही स्फोटके पेरून ठेवण्यात आली होती. या स्फोटात २० जण ठार तर अन्य २० जण जखमी झाल्याचे हंगू जिल्हा पोलीस प्रमुख मियान मोहम्मद सईद यांनी वार्ताहरांना सांगितले.
या स्फोटाची जबाबदारी अद्यापपर्यंत कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. गेल्या काही वर्षांत हंगू जिल्ह्य़ात स्फोटांच्या अनेक घटना घडल्या असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

Story img Loader