बंगळुरूमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा भाजपला विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, अशी मुक्ताफळे कॉंग्रेस नेते शकील अहमद यांनी उधळली आहेत. बुधवारी सकाळी बंगळुरूमधील भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट झाला. स्फोटासाठी आयईडीचा वापर करण्यात आला होता. स्फोटामध्ये १६ जण जखमी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शकील अहमद यांनी हे वक्तव्य केलंय. त्यांचे हे वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
जर हा स्फोट दहशतवादी हल्ला असेल, तर त्याचा फायदा भाजपला येत्या निवडणुकीत नक्कीच होईल, असे शकील अहमद यांनी म्हटले आहे. ट्विटरवर त्यांनी हे वक्तव्य केले. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकण्यात आले आहे. भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता बॉम्बस्फोटही निवडणुकीचा विषय बनल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा