अफगाणिस्तानच्या जलालाबाद येथील भारतीय दूतावासानजीक काही वेळापूर्वी आत्मघाती हल्ला झाल्याचे वृत्त आहे. यावेळी भारतीय दुतावासाच्या परिसरात स्फोट आणि गोळीबार झाला. या परिसरात अन्य देशांचेही दुतावास आहेत. या हल्ल्यात आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अद्यापपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्विकारलेली नाही. जानेवारी महिन्यात अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ येथील भारताच्या वाणिज्य दूतावासावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता.

Story img Loader