Blinkit Ambulance In 10 Minutes Service : किराणा सामानापासून कागदपत्रांच्या प्रिंटआउट्सपर्यंतच्या गोष्टी काही मिनिटांत पोहचवणारे इन्स्टंट डिलिव्हरी ॲप ब्लिंकिट आता रुग्णवाहिका सेवाही पुरवणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बिंदर धिंडसा यांनी ब्लिंकिटची ‘१० मिनिटांत अँम्बुलन्स’ ही सेवा गुरुवारपासून गुरुग्राममध्ये सुरू झाली असल्याची माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली. दरम्यान गुरुग्राममध्ये पाच रुग्णवाहिकांसह ही सेवा शहरात सुरू झाली आहे.

ब्लिंकिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बिंदर धिंडसा आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले, “१० मिनिटांत अँम्बुलन्स.. आम्ही आपल्या शहरांमध्ये वेगवान आणि विश्वासार्ह रुग्णवाहिका सेवा पुरवण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहोत. गुरुग्राममध्ये आजपासून पहिल्या पाच रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार आहेत. आम्ही आणखी शहरांमध्ये ही सेवा सुरू करणार असून, तुम्हाला @letsblinkit ॲपद्वारे बेसिक लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका बुक करता येणार आहे.”

Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
colors marathi abeer gulal serial likely to off air
अवघ्या ६ महिन्यांत गाशा गुंडाळणार कलर्स मराठीची मालिका? मुख्य अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “शेवटचे काही…”
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
neena kulkarni
“मी जिवंत आहे”, निधनाची अफवा पसरल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची पोस्ट, म्हणाल्या…
IFS, UPSC, girl opt IFS, IAS IPS, Vidushi Singh,
आयएएस, आयपीएसचा पर्याय सोडून आजीआजोबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयएफएसची निवड
abhishek bachchan express opinion with living family
अभिषेक बच्चनने लग्नानंतरही पालकांबरोबर राहण्याविषयी मांडले होते मत; म्हणाला, “माझ्या आईचा एक नियम…”
vishakha subhedar son made besanache ladoo for first time
विशाखा सुभेदारच्या परदेशी गेलेल्या लेकाने पहिल्यांदाच बनवले लाडू! अभिनेत्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू; म्हणाली, “मी घरी नसूनही…”

हे ही वाचा : Diljit Dosanjh : “त्याला खरंच काळजी असती तर…” पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने दलजीत दोसांझवर शेतकरी आंदोलक संतापले

रुग्णवाहिकेत काय काय सुविधा मिळणार?

यावेळी ब्लिंकिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बिंदर धिंडसा यांनी ही सेवा नफा कमावण्याच्या दृषीने सुरू केली नसल्याचे स्पष्ट केले. येत्या दोन वर्षांमध्ये ‘१० मिनिटांत अँम्बुलन्स’ सर्व प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्याचे ब्लिंकिटने उद्दिष्ट ठेवले आहे. या रुग्णवाहिका प्राणवायू सिलेंडर, स्ट्रेचर, मॉनिटर, सक्शन मशीन आणि आवश्यक आपत्कालीन औषधे आणि इंजेक्शन्ससह जीवनानश्यक उपकरणांसह सुसज्ज असल्याचे पोस्टमध्ये सांगितले आहे. प्रत्येक रुग्णवाहिकेत एक पॅरामेडिक, एक सहाय्यक आणि एक प्रशिक्षित चालक असणार आहे.

पोस्टमध्ये धिंडसा यांनी शेअर केलेल्या फोटोंपैकी एकात ही रुग्णवाहीका बुक केल्यानंतर रुग्णापर्यंत दहा मिनिटांत पोहचणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी बुकिंग चार्जेस दोन हजार रुपये असणार आहेत.

हे ही वाचा : Mamata Banerjee : घुसखोरीच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचे BSFकडे बोट; केंद्र सरकारवरही केले गंभीर आरोप

काय आहे ब्लिंकिट?

ब्लिंकिट ही एक ऑनलाइन वितरण सेवा असून, जी हजारो उत्पादनांची झटपट डिलिव्हरी देते. यामध्ये किराणा सामान, फळे व भाज्या, केक, बेकरी प्रोडक्ट्स, मांस, सीफूड, सौंदर्य प्रसाधने, मोबाईल, ॲक्सेसरीज आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा समावेश आहे. ब्लिंकिटची स्थापना २०१३ मध्ये अल्बिंदर धिंडसा आणि सौरभ कुमार यांनी केली होती. दरम्यान २०२२ मझ्ये झोमॅटोने ब्लिंकिटमध्ये १० टक्के शेअर्स खरेदी केले आहेत.

Story img Loader