Gautam Adani News : उद्योजक मुकेश अंबानी यांना मागे टाकून उद्योगपती गौतम अदाणी हे आता क्रमांक एकचे व्यक्ती झाले आहेत. भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदाणींचा समावेश झाला आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीतही गौतम अदाणी यांनी मोठी झेप घेतली आहे. जगातल्या अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदाणी १२ व्या स्थानावर पोहचले आहेत. तर मुकेश अंबानी हे जगातील अब्जाधीशांच्या यादीत १२ व्या स्थानावरुन १३ व्या स्थानावर पोहचले आहेत.

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती किती?

ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानींची संपत्ती ९७ अब्ज डॉलर्स आहे. गेल्या २४ तासांत गौतम अदाणी यांची एकूण संपत्तीत मोठी भर पडली आहे. अदाणी समूहाचे मालक असलेले गौतम अदाणी हे आता भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर तर जगातील अब्जाधीशांच्या यादीत १२ व्या स्थानावर पोहचले आहेत. गुरुवारपर्यंत अदाणी या यादीत १४ व्या क्रमांकावर होते. मात्र गेल्या २४ तासांत त्यांनी केलेल्या प्रचंड कमाईमुळे त्याच्या नेट वर्थमध्ये चांगली वाढ झाली आहे. ज्यामुळे ते आता १४ व्या स्थानावरून १२ व्या स्थानावर पोहोचले आहेत. ज्यानंतर गौतम अदाणी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ९७.६ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

How India response to Vladimir Putin in the Ukraine war
युक्रेन युद्धात पुतिन यांना हवी भारताची मध्यस्थी? भारताकडून प्रतिसादाची शक्यता किती?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Nitin Gadkari statement about Indian citizens on free stuff Nagpur news
फुकटेगिरीत भारतीय सर्वाधिक..! नितीन गडकरींचे बिनधास्त बोल
Hurun India Rich List 2024 | who is the richest Indian Professional Manager | Jayshree Ullal
Hurun Rich List : सर्वात श्रीमंत भारतीय व्यावसायिक व्यवस्थापक जयश्री उल्लाल कोण? त्यांची एकूण संपत्ती किती?
Success Story of second richest IITian Vinod Khosla
जिद्दीला सलाम! अपयशाची रांग असूनही केले अथक प्रयत्न अन् झाले जगातील सर्वात श्रीमंत IITian’sपैकी एक; जाणून घ्या विनोद खोसला यांची यशोगाथा
japans tomiko itooka news
Tomiko Itooka : जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती कोण? ‘या’ महिला गिर्यारोहकाने पटकावला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा किताब!
Tata Punch SUV Car
देशातील बाजारपेठेत ६.१३ लाखाच्या SUV समोर क्रेटा, ब्रेझा, नेक्साॅनसह सर्वांची बोलती बंद, झाली दणक्यात विक्री
Sheikh Hasina head of state in Bangladesh in the Indian subcontinent has always faced conflict
उठाव, बंड, हत्या… भारतीय उपखंडातील महिला राष्ट्रप्रमुखांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष?

गेल्या दोन दिवसांच्या वाढीसोबतच शुक्रवारी अदाणी समूहाच्या शेअर्समध्येही जोरदार वाढ दिसून आली आहे. BSE वर ACC सिमेंटचे शेअर्स ३.२० टक्क्यांनी वाढून २,३५२ रुपये प्रति शेअर झाले यासह अदाणी पोर्ट सुमारे ३ टक्के, अदाणी पॉवर २ टक्के, अदाणी टोटल गॅस २ टक्के, अदाणी विल्मर शेअर ०.१२ टक्के, अंबुजा सुमारे ३ टक्क्यांनी वाढले. तर अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्स ०.१८ टक्क्यांनी घसरले. याशिवाय अदाणी एनर्जी सोल्युशन्स ०.४१ टक्के आणि अदाणी एनर्जी ०.४३ टक्क्यांनी घसरले.