बांगलादेशमधील उजव्या विचारसरणीचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या जमाते-इस्लामीला भविष्यात निवडणुका लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाने एका निर्णयाद्वारे त्यांची नोंदणी रद्द केली, त्यामुळे या पक्षाची वाटचाल कठीण झाली आहे. जमाते-इस्लामीला राजकीय पक्ष म्हणून असलेल्या वैधतेबाबत न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर न्यायालयाने जमाते इस्लामीची मान्यता रद्द केली. बांगलादेशमधील तरिकत महासंघाचे सरचिटणीस जनरल रेझूल हक चौधरी आणि इतर २४ जणांनी याबाबत २५ जानेवारी २००९ मध्ये याचिका दाखल केली होती. जमाते इस्लामी हा धार्मिक पक्ष असून त्यांचा बांगलादेशचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यावर विश्वास नाही, असा युक्तिवाद याचिकेत केला होता. तो खंडपीठाने उचलून धरून जमाते-इस्लामीवर बंदी घातली.

Story img Loader