‘स्लमडॉग मिल्यनेयर’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटचा दिग्दर्शक डॅनी बोएलने ब्रिटिश राणीकडून दिली जाणारी ‘नाइटहूड’  ही प्रतिष्ठेची पदवी नाकारली आहे.
लंडन ऑलिम्पिकच्या सोहळ्याच्या संस्मरणीय उद्घाटनाचे दिग्दर्शन केल्याबद्दल बोएलला ही पदवी बहाल करण्यात आली होती. मात्र आपल्याला सामान्य नागरिक म्हणून राहणे पसंत आहे असे सांगत त्याने ही पदवी नाकारली.
लंडन ऑलिम्पिकच्या कल्पक उद्घाटन सोहळ्याने बोएलची जगभर प्रशंसा झाली होती. त्याचबरोबर या उद्घाटन कार्यक्रमात ब्रिटनच्या राणीनेही डॅनियल क्रेग या बॉण्डपटाच्या नायकासमवेत उपस्थिती लावल्याने सर्वानाच आश्चर्य वाटले होते.
याबाबत बोएलशी संपर्क साधला असता त्याने ही पदवी स्वीकारण्यास नकार दिला असे, ब्रिटिश अधिकाऱ्याने सांगितले. तर एक सामान्य नागरिक म्हणून राहण्यास आपल्याला अधिक स्वारस्य असल्याची प्रतिक्रिया बोएलने दिली असल्याचे ‘डेली स्टार’ या ब्रिटिश वृत्तपत्राने दिली आहे.     

Story img Loader